जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची पुन्हा मोजण्यासाठी भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला नेपाळने नकार दिला आहे.२०१५मध्ये झालेल्या भूकंपानंतर नेपाळने एव्हरेस्टची उंची एका मोहिमेद्वारे आखली होती. मात्र आता भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला नेपाळ सरकारने नकार दिला आहे, अशी माहिती हिमालयीन नेशन सर्व्हे डिपार्टमेंटने दिली आहे नेपाळ सरकार भारत आणि चीनकडून एव्हरेस्ट संदर्भातील महत्त्वाची माहिती घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. नेपाळ सरकारने उंची मोजण्यास नकार देण्यामागे चीन सरकारने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती नवी दिल्लीतील काही अधिकाऱ्यांनी दिली. एव्हरेस्ट शिखर सिनो-नेपाळ सीमेवर असल्याने हा नकार देण्यात आल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews